तुम्हाला माहित आहे का? दिवाळीतील मनाने बुद्धीला निरागसपने विचारलेला एक अतिशय सामान्य प्रश्न, खाऊ कि नको ?
खायची तर
खूप इच्छा होतेय, तोंडाला पण पाणी सुटलंय पण ..... खाऊ कि नको ?
काळजी करू
नका याच प्रश्नच उत्तर म्हणून मी सचिन कासा (सका : सकारात्मक) Certified वेलनेस कोच
आणि Founder of कासा वेलनेस तुमच्यासाठी घेऊन आलोय ५ युक्त्या ज्या तुम्हाला या दिवाळीत
दोषी न वाटता सर्व पदार्थांचा आस्वाद घेण्यास मदत करतील.
जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण
वाचा. शेवटी तुमच्यासाठी एक दिवाळी बोनस आहे.
खरतर दिवाळी
म्हणजे दिव्यांचा सण, उत्साहाचा सण, गाठीभेटींचा सण, आनंदाचा सण आणि दिवाळी म्हणजे
चिभेजे चोचले पुरविण्याची पर्वणी म्हणून मग मनसोक्त खाणं अपरिहार्य आहे. अगदी साध्या
आणि छ्योट्या छ्योट्या युक्त्या लक्ष्यात ठेवल्या तरी पुरेसे आहे. चला तर मग पाहूया
काय आहेत या ५ युक्त्या?
२.मनसोक्त खा: दिवाळीचा फराळ आवडीने आणि मनसोक्त खावा (मनसोक्त म्हणजे मन भरेपर्यंत पोट भरेपर्यंत न्हवे) फराळ खाताना थोडा थोडा चवीने आणि चावून खा. खाता खाता करणाऱ्याची स्तुती करा. गप्पा जास्त मारा म्हणजे आग्रह कमी होईल. फराळ करण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या. सोबत लहान मुलांना घ्या. दररोजच्या जीवनात तशी सर्व जबाबदारी स्वतःच घेता पण इथे तो फराळ संपवण्याची जबाबदारी थोडी त्या लहान मुलांना पण घेऊ द्या.
३. भरपूर पाणी प्या: दिवाळीमध्ये अधिक तेलकट, गोड आणि मसालेदार पदार्थ खाण्यामध्ये येतेय तर पोट गडगडण्याची दाट शक्यता असते तर चांगले पचन होण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची गरज असते. दर एक तासांनी थोडं थोडं आणि फराळ करण्याआधी पाणी प्यावे. सकाळी उठल्याउठल्या आणि रात्री झोपताना थोडं कोमट पाणी पिणे चांगले.
४. नेहमीची दिनचर्या पाळा: खूप दिवसानंतर एकत्र आलेल्या घरच्यांसोबत उत्तम वेळ घालवा, ४ दिवस TV आणि mobile चा वेळ घरच्यांना द्या. मनसोक्त गप्पा मारत मारत लवकर झोपा. सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये morning walk करत करत गुलाबी गप्पा रंगूद्या. सोबत नियमितचा व्यायाम आवर्जून करा. जेवणाच्या वेळा पाळा. खाण्यामध्ये दही (Probiotic), सलाड (Fiber) याचा समावेश करा.
५. प्रमाण, गुणवत्ता आणि वेळ याचे भान ठेवा: सकाळचा नाश्ता आणि रात्री सूर्यास्तानंतर दिवाळीचा फराळ किंव्हा गोड पदार्थ खाणे शक्यतो टाळा. सकाळचा नाश्ता हा सर्वांत महत्त्वाचा आणि पोषणयुक्त होणं गरजेचे असते आणि सूर्यास्तानंतर आपली जास्त शाररिक हालचाल होत नसल्याने अन्नपदार्थांमधून मिळालेली ऊर्जा वापरली जात नाही आणि त्याचे रूपांतर चरबीमध्ये होते. अन्न खाल्यानंतर मेंदूपर्यंत सूचना पोचण्यास साधारण २० मिनिटे लागतात तर खाताना या गोष्टीला लक्ष्यात ठेवून पोटात थोडी रिकामी जागा ठेवावी कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास अपायकारक ठरते. प्रमाण लक्ष्यात घेऊन मनसोक्त खावे पण चांगल्या प्रतीचे खावे.
या ५ युक्त्या
साध्या, सरळ आणि सोप्प्या आहेत पण नक्कीच याने तुम्हाला दिवाळीचा फराळ मनसोक्त खाता
येईल आणि स्वस्थही राहता येईल. लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनपूर्वक आभार.
तुम्हाला कोणती युक्ती जास्त आवडली हे अभिप्राय देऊन नक्की कळवा आणि हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.
दिवाळी बोनस
JOIN
KASA WELLNESS COMMUNITIES FOR COMPLETE WELLNESS GUIDANCE
Facebook
https://www.facebook.com/groups/1500137600352004
Instagram
https://www.instagram.com/sakawellness/
Youtube
https://www.youtube.com/channel/UCVJ-ez0x4V4bu2Vb96ZHdFA
WhatsApp
https://chat.whatsapp.com/HBBqa9aJ7uaJWZxc83V4BN
ACTIVELY INVOLVE IN COMMUNITY AND GET 1 HOUR 121 SESSION OF WORTH 999/- FREE FOR FIRST LUCKY 10 INDIVIDUALS.
For more details
https://linktr.ee/kasawellness
अप्रतिम लेख...
ReplyDeleteधन्यवाद मॅडम
Deleteफार छान लेख लिहिला आहे.....
Deleteअतिशय सोप्या आणि साध्या शब्दात उपयुक्त टिप्स. 👍🏻
ReplyDeleteधन्यवाद मॅडम
Deleteखूप छान
ReplyDeleteधन्यवाद मॅडम
DeleteKhup sunder tips mala 1st Ani 5th khup avadli. Khatana hyane maze vajan vadhel. Cholesterol vadhel asa vichar nasava. Khup sunder. want more tips like this from you.
ReplyDeleteKeep it up.
Thank you so much 🙏🏻
Deleteजबरदस्त
ReplyDeleteKhoopach chan
ReplyDeleteSuperb 👍👏
ReplyDelete