Skip to main content

स्वस्थ आणि आनंदी राहण्याचे ८० - २० सूत्र

तुम्हा सर्वांना माहितंच आहे कि सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आपलं शरीर ज्याची तुलना आपण कोणत्याच संपत्तीशी करू शकत नाही. आपणाला ते विनामूल्य मिळालेलं आहे आणि म्हणूनच कदाचित आपण त्याकडे दुर्लक्ष्य करीत असतो. 



प्रसिद्ध तत्वज्ञानी जिम रॉन सुद्धा सांगून गेले कि आपल्या शरीराची काळजी घ्या. आपल्याला राहण्यासाठी फक्त तेच एक स्थान आहे. पण आपल्या शरीराची किंमत आपणाला स्वाथ्य बिघडल्याशिवाय समजत नाही.  

आपल्या शाररिक, मानसिक आणि आध्यत्मिक स्वास्थ्यावर आपले सामाजिक आणि आर्थिक स्वास्थ अवलंबून असते. मनुष्य हा बुद्धिमान प्राणी असलातरी ८०% तो आपल्या भावनांच्या नियंत्रणात राहून काम करत असतो. स्वयंनियंत्रणासाठी ८०-२० सूत्र खूप उपयोगी आहे. 

आजकालच्या बदलत्या राहणीमानामुळे आणि अन्न पदार्थांच्या ढासळत असलेल्या प्रतिमुळे आपण वेगवेगळ्या आजारांशी झगडतो आहे. 

स्वस्थ आणि आनंदी राहण्याचे हे ८०-२० सूत्र अगदी सरळ आहे आणि ते समजून आपण आयुष्यभर प्राणघातक शाररिक आणि मानसिक आजारांपासून दूर राहू शकतो. 

मी सचिन कासा (सका : सकारात्मक) Certified Wellness Coach and Founder of KASA Wellness _ Health & Happiness. हेच सूत्र वापरून मी माझे २० kg वजन कमी केले आहे आणि याच सूत्राच्या आधारवर मी १०० हुन अधिक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकलो. येत्या ५ वर्ष्यात एकूण १० लाख किलो नको असलेल्या चरबीचे वजन कमी करण्याचा माझा ध्यास आहे.

चला तर जाणून घेऊया, 

काय आहे ८०-२० सूत्र ?  


८०% पौष्टिक संतुलित आहार आणि २०% नियमित व्यायाम 

८०% पौष्टिक संतुलित आहार


८०% पौष्टिक संतुलित आहारामध्ये पोषणतत्त्वे, त्याचे प्रमाण आणि वेळ माहित असणे गरजेचे आहे. 

पोषणतत्त्वे म्हणजे कर्बोदके (Carbohydrates), प्रथिने (Proteins), स्निग्ध पदार्थ (Fats), जीवनसत्वे (Vitamins), खनिज पदार्थ (Minerals) आणि पाणी.

पोषणतत्वांचे प्रमाण हे प्रत्येकाच्या शाररिक हालचालीनुसार आणि क्षमतेनुसार संतुलित असणे गरजेचे आहे. जागतिक पोषण तत्वज्ञानानुसार (Global Nutrition Philosophy) आहारमध्ये ४०% कर्बोदके (Carbohydrates), ३०% प्रथिने (Proteins), ३०% स्निग्ध पदार्थ (Good Fats), जीवनसत्वे (Vitamins) आणि खनिज पदार्थ (Minerals) असावेत. त्याचबरोबर २५ ग्रॅम ते ४० ग्रॅम तंतुमय पदार्थ (Fiber) असावेत. वेगवेगळ्या पोषणतत्वांचे वेगवेगळे स्रोत आहेत. पाण्याचेही तितकेच महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या वजनानुसार १ लिटर प्रति २० किलो पाणी पिणे गरजचे असते. यासोबत ६ ते ८ तास रात्रीची झोप घेणे अत्यंत महत्वाची असते. 

२०% नियमित व्यायाम 












 


२०% नियमित व्यायामामध्ये योगासन, ध्यानधारणा आणि प्राणायाम दररोज कमीत कमी ३० ते ४५ मिनिटे करणे गरजेचे आहे. व्यायाम करताना योग्य पद्धतीने श्वासोउच्छवास आणि सहजता असणे गरजेचे असते. आपलं कोणतंच काम शरीरापेक्षा महत्वाचे नसते त्यामुळे व्यायामासाठी नियमित वेळ काढणे अनिवार्य आहे.

८०-२० सूत्रानुसार आपण वजनाचे व्यवस्थापन करू शकतो आणि राहणीमानामुळे होणाऱ्या असंख्य आजारांपासून उदारणार्थ मधुमेह, रक्तदाब, पित्त, काही प्रकारचे कर्करोग इत्यादींपासून आपण कायमचे दूर राहू शकतो. 

पोषणतत्वांचे वेगवेगळे स्रोत कोणते? पाणी कधी प्यावे? पाण्याच्या कमतरतेमुळे आणि अधिक पाणी पिल्याने काय होते? ताणतणावाचे नियंत्रण कसे करावे? आणि उंचीनुसार वजनासाठी ऊर्जेचे व्यवस्थापन (Calories Management) कसे करावे? यामागचे विज्ञान जाणून घ्या.  

सविस्तर माहितीसाठी जॉईन करा कासा WELLNESS

असे म्हणतात 'जसे अन्न तसे मन'. सुधृढ शरीरात प्रसन्न मन राहते आणि चांगले व्यक्तिमत्व घडते.                

जीवन जगण्याचे ८०-२० हे सूत्र अजमावून आपण नक्कीच आयुष्यभर स्वस्थ आणि आनंदी राहू शकतो.

मित्रांनो, वाढते वजन धोका आहे पण घाबरू नका उपाय अगदी सोप्पा आहे.

फक्त तातडीच्या गोष्टींमध्ये महत्वाच्या गोष्टींची टाळाटाळ होऊ नये अन्यथा अनर्थ टाळता येणार नाही.

योग्य वेळेची वाट पाहत असाल तर ती आत्ताच आहे. 

धन्यवाद 

Comments

  1. वाह..!
    सचिन मस्त मस्त एकच नंबर...
    I am proud of you...!

    ReplyDelete
  2. सचिन सर खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती
    God bless you 👍 👍
    Padmaja Patil

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिला आहे very informative

    ReplyDelete
  4. Khoopch chan mahiti dili sir you are so great 🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

5 tricks to eat heartily this Diwali and still be healthy

You know what A very common question asked by the mind on Diwali is whether to eat or not. I want to eat a lot, My mouth is watering but ..... should I eat or not? Don't worry; I am Sachin Kasa (Positive) Certified Wellness Coach and Founder of Kasa Wellness giving the 5 tips which will help you to enjoy all the dishes without feeling guilty this Diwali. Read the entire blog there is a Diwali bonus for you at the end. In fact, Diwali is a festival of lights, a festival of excitement, a festival of reunions, a festival of joy and Diwali is a festival of delicious foods, so eating heartily is inevitable. It is enough to keep in mind even the simplest and simplest tricks. So let's see what these 5 tricks are. 1. Positive Mindset : Diwali is four days long and comes every year so tasting different foods during 4 days of Diwali does not lead to sudden weight gain of 10 kg or permanent deterioration of health. Eat happily because feelings of guilt have more detrimental effe...

५ युक्त्यांनी या दिवाळीत मनसोक्त खा आणि तरीही आणि स्वस्थ रहा

तुम्हाला माहित आहे का? दिवाळीतील मनाने बुद्धीला निरागसपने विचारलेला एक अतिशय सामान्य प्रश्न, खाऊ कि नको ? खायची तर खूप इच्छा होतेय, तोंडाला पण पाणी सुटलंय पण ..... खाऊ कि नको ? काळजी करू नका याच प्रश्नच उत्तर म्हणून मी सचिन कासा (सका : सकारात्मक) Certified वेलनेस कोच आणि Founder of कासा वेलनेस तुमच्यासाठी घेऊन आलोय ५ युक्त्या ज्या तुम्हाला या दिवाळीत दोषी न वाटता सर्व पदार्थांचा आस्वाद घेण्यास मदत करतील. जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. शेवटी तुमच्यासाठी एक दिवाळी बोनस आहे.   खरतर दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, उत्साहाचा सण, गाठीभेटींचा सण, आनंदाचा सण आणि दिवाळी म्हणजे चिभेजे चोचले पुरविण्याची पर्वणी म्हणून मग मनसोक्त खाणं अपरिहार्य आहे. अगदी साध्या आणि छ्योट्या छ्योट्या युक्त्या लक्ष्यात ठेवल्या तरी पुरेसे आहे. चला तर मग पाहूया काय आहेत या ५ युक्त्या?   १. सकारत्मक मनस्थिती असुद्या: दिवाळी ही चार दिवसांची आहे आणि दरवर्षी येते त्यामुळं दिवाळीच्या ४ दिवसात वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतल्याने काय अचानक १० किलो वजन वाढत नाही किंव्हा कायमची तब्येत खराब होत नाही. आनंदान...