Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

स्वस्थ आणि आनंदी राहण्याचे ८० - २० सूत्र

तुम्हा सर्वांना माहितंच आहे   कि  सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आपलं शरीर ज्याची तुलना आपण कोणत्याच संपत्तीशी करू शकत नाही. आपणाला ते विनामूल्य मिळालेलं आहे आणि म्हणूनच कदाचित आपण त्याकडे दुर्लक्ष्य करीत असतो.  प्रसिद्ध तत्वज्ञानी जिम रॉन सुद्धा सांगून गेले कि आपल्या शरीराची काळजी घ्या. आपल्याला राहण्यासाठी फक्त तेच एक स्थान आहे. पण आपल्या शरीराची किंमत आपणाला स्वाथ्य बिघडल्याशिवाय समजत नाही.   आपल्या शाररिक, मानसिक आणि आध्यत्मिक स्वास्थ्यावर आपले सामाजिक आणि आर्थिक स्वास्थ अवलंबून असते. मनुष्य हा बुद्धिमान प्राणी असलातरी ८०% तो आपल्या भावनांच्या नियंत्रणात राहून काम करत असतो. स्वयंनियंत्रणासाठी ८०-२० सूत्र खूप उपयोगी आहे.  आजकालच्या बदलत्या राहणीमानामुळे आणि अन्न पदार्थांच्या ढासळत असलेल्या प्रतिमुळे आपण वेगवेगळ्या आजारांशी झगडतो आहे.  स्वस्थ आणि आनंदी राहण्याचे हे ८०-२० सूत्र अगदी सरळ आहे आणि ते समजून आपण आयुष्यभर प्राणघातक शाररिक आणि मानसिक आजारांपासून दूर राहू शकतो.  मी सचिन कासा (सका : सकारात्मक) Certified Wellness Coach and F...